Sunday, 10 December 2006

कुठेस तू


तू आता कशी असशील, थोडा घाबरलोय
तू अजून तशीच असशील? थोडा बावरलोय...
आज तू पुन्हा मला जवळ करशील? कारण,
इतक्या दिवसात मी पण थोडा बदललोय...

हल्ली रोज रात्री झोप सुद्धा थकून म्हणते -
प्रेमात "पडलेला" तुला असे कधीच पाहिले नव्हते.

गळ्यातली गाणी, खिशातली नाणी
पण डोळ्यातले पाणी आणि मन सुन्न;
वाटले मी चंचल असेन, अजून कोणी पुसेल,
मन पुन्हा फसेल, पण जगच किती भिन्न !

माझी कथा माझी व्यथा कशी मी आज सांगू तुला
न कळे कधी माझ्यातला एक हिस्सा हरवला.

तोपर्यंत माझीच समजूत कशी घालत राहू ?
कधी पर्यंत बोलणे असेच टाळत राहू ?

नकार जरी असला तरी तो आज मला कळू दे
अजून थोडी समजूतदार झालीस तू आज.... आज तरी तुला भेटू दे.

- कार्तिक
१० डिसेंबर २००६

2 comments:

Anonymous said...

translation required!

chin said...

gud kavita.... n in general, fundoo blog...